Land Record | खुशखबर आता फक्त 100 रुपयात होणार शेताची वाटणी सविस्तर बातमी पहा !

 

 

Land Record : वारसा हक्काने चालत आलेल्या शेतजमिनीची वाटणी अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे क्लिष्ट बनून जाते.काहीवेळा ही प्रक्रिया खर्चिकही ठरू शकते.
मात्र,आता वारसांमध्ये सामंजस्य असेल तर कमी वेळेत व केवळ १०० रुपयांच्या स्टैप पेपरच्या माध्यमातून शेतजमिनीचे विभाजन करून देण्याची विशेष मोहीम जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आखली आहे.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दिवाणीLand Record.

 

■अर्जासोबत काय हवे...

शेतजमिनीच्या विभाजनासाठी अर्जदाराने आपले नाव, सहधारकांचे नाव व पत्ता, अर्जदाराशी नाते, शेतजमिनीचा वर्ग, जिरायत / बागायत जमिनीचा तपशील, एकूण गटाचे क्षेत्र, अर्जदार व सहधारकांचे त्यातील क्षेत्र, १०० रुपयांच्या स्टैंप पेपरवर(Stamp Paper)आपसात वाटणी केलेले क्षेत्र, त्याच्या चतुःसीमा व इतर आवश्यक बाबींच्या नोंदी घेऊन अर्जदार व सहधारकांची स्वाक्षरीसह संमती, आदी बाबींची पूर्तता केल्यास विभाजनाचे काम तातडीने करून देण्यात येणार आहे.

 

हे पण वाचा :भारतीयांचे हे देशी जुगाड पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल आणि त्यांचे कारनामे पाहून तुम्ही हसताल पोट धरून !

 

न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे किंवा शेतजमिनीच्या सहधारकांनी अर्ज केल्यास जमिनीचे विभाजन करण्याची पद्धती अधिनियम १९४७ मधील तरतुदीत विषद करण्यात आली आहे.

 

ओम्बासे यांनी सर्व तहसीलदारांनी शेतजमिनीचे विभाजन करण्यासाठी मोहीम स्वरूपात हे काम प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश गुरुवारी काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. यामुळे वेळ व पैशांचा खर्च चांगलाच कमी होणार आहे.

 

दरम्यान शेतजमिनीच्या एकत्रित किंवा संयुक्त धारकांपैकी कोणत्याही एका व्यक्तीने तहसीलदारांकडे जमीन विभाजनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. या मोहिमेचा आवश्यक धारकांनी लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.

 

या तरतुदींना अधीन राहून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे विभाजन केवळ १०० रुपयांच्या स्टेप पेपरवर करून देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी केले आहे.

 

हे पण वाचा : 2000 च्या नोटा जमा करण्याची मुदत वाढवली, RBI ने दिली महत्वाची माहिती

 

 

 

Leave a Comment