Distribution of land | फक्त शंभर रुपयात होणार जमिनीची वाटणी महसूल विभागाची विशेष मोहीम,वेळ तसेच पैशांचीही होणार बचत…

 

 

Distribution of land : नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले सर्वांचे आमच्या कृषी अपडेट 24 तास या संकेतस्थळावर स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट शेती संबंधी देणार आहोत शेतकऱ्यांना आता आपल्या जमिनीची वाटणी फक्त शंभर रुपये देऊन करता येणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पहा !

वारसा हक्काने चालत आलेल्या शेतजमिनीची वाटणी अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे क्लिष्ट बनून जाते. काहीवेळा ही प्रक्रिया चर्चिकही ठरू शकते. मात्र, आता रसांमध्ये सामंजस्य असेल तर कमी ळेत व केवळ १०० रुपयांच्या स्टेप परच्या माध्यमातून शेतजमिनीचे विभाजन करून देण्याची विशेष मोहीम जल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आखली आहे.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दिवाणी

न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे किंवा शेतजमिनीच्या सहधारकांनी अर्ज केल्यास जमिनीचे विभाजन करण्याची पद्धती अधिनियम १९४७ मधील तरतुदीत विषद करण्यात आली आहे.या तरतुदींना अधीन राहून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे विभाजन केवळ १०० रुपयांच्या स्टैप पेपरवर करून देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.

शेतीसंबंधी महत्त्वाच्या बातम्या येथे क्लिक करून वाचा

ओम्बासे यांनी सर्व तहसीलदारांनी शेतजमिनीचे विभाजन करण्यासाठी मोहीम स्वरुपात है काम प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश गुरुवारी काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. यामुळे वेळ व पैशांचा खर्च चांगलाच कमी होणार आहे.

दरम्यान शेतजमिनीच्या एकत्रित किंवा संयुक्त धारकांपैकी कोणत्याही एका व्यक्तीने तहसीलदारांकडे जमीन विभाजनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. या मोहिमेचा आवश्यक धारकांनी लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी केले आहे.

शेत जमिनीची वाटणी कशी करायची याविषयी सविस्तर माहिती येथे वाचा

■अर्जासोबत काय हवे

शेतजमिनीच्या विभाजनासाठी अर्जदाराने आपले नाव, सहधारकांचे नाव व पत्ता, अर्जदाराशी नाते, शेतजमिनीचा वर्ग, जिरायत / बागायत जमिनीचा तपशील एकूण गटाचे क्षेत्र, अर्जदार व सहधारकांचे त्यातील क्षेत्र, १०० रुपयांच्या स्टैप पेपरवर आपसात वाटणी केलेले क्षेत्र, त्याच्या चतुःसीमा व इतर आवश्यक बाबीच्या नोंदी घेऊन अर्जदार व सहधारकांची स्वाक्षरीसह समती, आदी बाबींची पूर्तता केल्यास विभाजनाचे काम तातडीने करून देण्यात येणार आहे

 

हे पण वाचा :पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये फक्त तीन लाख रुपये जमा करा आणि चाळीस हजार रुपये पेन्शन दर महिना मिळवा

 

 

Leave a Comment