खुशखबर राज्यातील या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना 4% महागाई भत्ता वाढ | DA Hike News

DA Hike News:भारत सरकार, वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या क्रमांक १/१/२०२४-E-II (B) दिनांक १२.०३.२०२४ च्या कार्यालयीन

ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१.०१.२०२४ पासून लागू करण्यात आलेला ४% वाढीव दराने महागाई भत्ता

(Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील

अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि.०१.०१.२०२४ पासून ५० % दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.

सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०३१३१६५७१८६३०७ असा आहे.

हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन निर्णय येथे क्लिक करून पहा

Leave a Comment