मोठी बातमी | शिक्षक-शिक्षकेतर पदे खासगी कंत्राटदारांद्वारे भरणार 9 संबंधित संस्थांना मान्यता; शासन निर्णय जाहीर !

 

Teacher Recruitment 2023 : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील शिक्षकांची भरती ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातूनच केली जाणार असल्याचे घोषित केले आहे. एकीकडे त्यासाठीची कार्यवाही सुरू असताना दुसरीकडे सरकारने बाह्य यंत्रणेकडून ( कंत्राटदार) राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक भरण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने नुकताच ‘जीआर’ काढून नऊ बाह्य सेवा पुरवठादार संस्थेच्या पॅनेलला (कंत्राटदारांना) मान्यता देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे.

 

बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सरकारने नऊ सेवा पुरवठा संस्था आणि पॅनेलची नियुक्ती केली आहे. यामध्ये अतिकुशल मनुष्यबळाच्या वर्गवारीत तब्बल ६५ प्रकारची विविध पदे भरली जातील. अकुशलची १० प्रकारची पदे, अर्धकुशल आठ आणि कुशल मनुष्यबळ असलेली ५० प्रकारची पदे कंत्राटदार संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. यामध्ये राज्यातील शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर आस्थापनांतील पदे भरण्याची मुभा कंत्राटदार संस्थांना मिळणार आहे.

 

पॅनेलच्या माध्यमातून सरकारच्या सर्व शासकीय विभागांसह महामंडळे आणि इतर सर्व आस्थापनांना कंत्राटदारांची सेवा घेणे बंधनकारक केल्याने आता अनुदानित, सरकारी शाळांतील शिक्षकांची पदेही या कंत्राटदारांकडून भरली जाणार आहेत. यात कुशल मनुष्यबळाच्या

 

भरती विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

राज्य वर्गवारीमध्ये विविध प्रकारची ५० पदे भरली जाणार आहेत. शिक्षक, सहायक शिक्षक आणि शिक्षकेतर पदे आदींचा यात समावेश आहे. कुशल वर्गवारीत शिक्षकांचा समावेश केल्याने राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक संघटनांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

 

■ शिक्षकांना २५-३५ हजार मानधन

शिक्षकांचा कुशल मनुष्यबळ वर्गवारीत समावेश करून राज्यातील डी. एड., बी. एड. त्यासोबतच ‘टीईटी’ आदी पात्रताधारक शिक्षकांची पदे येत्या काळात खासगी कंत्राटदार संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. यामध्ये बी.एड., डी.एड. त्यासोबतच पदवी आणि टीईटी आदी पात्रता असलेल्या आणि तीन वर्षे अनुभव असलेल्या शिक्षकांना ३५ हजार रुपये प्रतिमाह मानधन दिले जाणार आहे; तर दुसरीकडे सहायक शिक्षकासाठी प्रतिमहिना २५ हजारांचे मानधन दिले जाणार आहे.

 

नोकरी विषयी व इतर अपडेट जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment