शेतकऱ्यांनो सावधान ! ई-पीक पाहणी न केल्यास शेती दाखविणार पडीक !

 

 

Crop Insurence Claim Rule : शेतीतील पिकांचा पेरा ऑनलाइन नोंदवण्यासाठी मागील वर्षीपासून ई. पीक शेतकरी स्वतः अॅपद्वारे करीत आहेत. या वर्षीसुद्धा ई. पीक व्हर्जन २ ॲपद्वारे पाहणी केली जात आहे. यासाठी १५ ऑक्टोबर हा अंतिम कालावधी निश्चित केला आहे. या कालावधीत नवीन व्हर्जन अॅपमधून पीक पाहणी न केल्यास शेती पडिक नोंद दाखवण्यात येईल.

 

ई. पीक पाहणी करण्यासाठी ई. पीक वर्जन- २ हे नवीन अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून ई. पीक पाहणी चालू आहे. या अॅपद्वारे ई. पीक करतांना अक्षांश व रेखांश नोंदवीत असल्यामुळे तसेच जमिनीचे जीओ फेंसिंग म्हणजे सर्वे नंबरचे प्रत्यक्ष ठिकाण दर्शवत असल्याने पिकाचा फोटो प्रत्यक्ष शेतात काढून पीक पाहणी करावी; परंतु तसे न केल्यास व दुसऱ्या

 

सर्व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

ठिकाणचा फोटो घेतल्यास पीक पाहणी डाऊनलोड केले जाईल; पण ती नोंद चुकीची होईल.

 

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात आपल्या मोबाइलवरून ई. पीक पाहणीची नोंद करावी. ई. पीक पाहणीचे प्रमाण सेलू तालुक्यात अद्यापही कमी आहे त्यामुळे शेतकयांनी लवकरात लवकर ई. पीक पाहणी करावी. वनहक्क धारक शेतकऱ्यांच्या ऑनलाइन सात- बाराबाबतचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे.

 

भोगवटदार वर्ग- खातेदारांनी शेतामध्ये पीक असल्यास ई- पीक पाहणी अवश्यक करावी. शेतकऱ्याने केलेली ई- पीक पाहणी त्याने स्वघोषित केलेली असेल. तसे स्वघोषणापत्र ई पीक अॅपमध्ये घेतले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी नोंद करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. खरीप हंगामातील पिकांची नोंद करणे शेतकऱ्यांनी

 

आवश्यक असून त्याशिवाय पीक पेऱ्याची नोंद होणार नाही. ई- पीक पाहणी करताना अशी घ्या काळजीई पीक पाहणी करताना फोटो अस्पष्ट असल्यास दुसया ठिकाणचा फोटो घेतल्यास पीक पाहणी साठवली जाईल. परंतु सातबारावर आपोआप येणार नाही. चूकीनंतर तपासणी तलाठ्यांकडून केली जाईल सांगण्यात आले आहे.

 

शिवाय ही पीक पाहणी चुकीची वाटल्यास ४८ तासांच्या आतंच दुरुस्त करता येईल. १५ ऑक्टोबर पर्यंतच शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून घ्यावी अन्यथा या हंगामात शेती पडीक दाखविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून

 

हे पण वाचा :सोन्याच्या दारामध्ये मोठी घसरण दहा ग्रॅम चे आजचे नवीन दर येथे पहा !

 

 

 

Leave a Comment