New Crop Insurence | ३ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सततच्या पावसाचे अनुदान येणार ! शासन निर्णय निर्गमित…

 

 

New Crop Insurence : जून ते ऑगस्ट, २०२२ पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत..

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.

तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. राज्यात जुलै २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत, तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत.

दि.१०.०८.२०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरुन शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. सीएलएस- २०२२/प्र.क्र.२५३/म-३, दि. २२.०८.२०२२ अन्वये जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच इतर नुकसानीकरीता शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.११.०८.२०२१ अन्वये ज्या बाबींकरिता वाढीव दराने मदत अनुज्ञेय करण्यात आली होती त्याच दराने या कालावधीसाठी मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे. उर्वरित बाबीसाठी शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.१३.५.२०१५ अन्वये विहित करण्यात आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत अनुज्ञेय आहे.

जून ते ऑगस्ट, २०२२ या कालावधीत विविध जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे व उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता / शेतीपिकांच्या नुकसानीसाठी वर अ. क्र. २ येथे नमूद दि.२२.८.२०२२ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झाले होते.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानुसार बाचित शेतकऱ्यांना शेतीपिकांचे नुकसान व शेतजमिनीचे नुकसान याकरिता मदतीचे वाटप करण्यासाठी एकूण रु.३५०१.७१ कोटी रु. ९८.५८ कोटी व रुपये ३३५. १७ कोटी इतका निधी वर नमूद अनुक्रमे दि.८.९.२०२२, दि. १४.९.२०२२ व दि. २८.०९.२०२२ च्या शासन निर्णयान्वये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये २४ तासात ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात.

शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मात्र, महसूली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी

 

हे पण वाचा :आरबीआय बँकेने या दोन मोठ्या बँकांवर केली आज कारवाई खातेदारांना बसणार फटका

 

 

 

Leave a Comment