Loan waiver 2023 | ३४ हजार शेतकरी होणार कर्जमुक्त बँकेच्या कर्जाच्या थकबाकीमुळे सिबिल झाले होते !

 

loan waiver 2023 : भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या राज्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात घेतला. त्याची प्रक्रिया बँकेने सुरू केली असून, मार्च अखेरपर्यंत ती पूर्ण होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होणार आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. विहीर खोदणे, पाइपलाइन, ट्रॅक्टर खरेदी आदींसाठी भूविकास बँक दीर्घ मुदतीचे कर्ज शेतकऱ्यांना देत असे.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ४ हजार ११५ शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत.
त्यांचे ३८ कोटी ९४ लाख रुपये मुद्दल आणि ९१ कोटी ५८ लाख रुपये व्याज अशी एकूण १२८ कोटी ५० लाख रुपये माफी मिळणार आहे. कर्जमाफीची प्रक्रिया मार्च अखेरपर्यंत पूर्ण होईल आणि यानंतर या शेतकयांचे सातबारे कोरे होणार असल्याचे बँकेचे जिल्हा व्यवस्थापक कुटे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या येथे क्लिक करून वाचा

केवळ दोन रुपयांच्या अर्जावर भूविकास बँक शेतकऱ्यांना कर्ज देते. एवढेच नव्हे तर केवळ ७० रुपयांत कर्जाचा बोजा सात-बारावर चढविला जात होता. नाममात्र दरात शेतकऱ्यांना कर्ज देणारी ही बैंक केवळ मुदतीत वसुली न होऊ शकल्याने आणि शासनाने बँकेला हमी देण्यास नकार दिल्याने डबघाईला आली होती. बँकेने कर्ज वाटप बंद केले आणि केवळ कर्ज वसुली सुरू केली होती.

 

मात्र, मध्यंतरी शासनाने जाहीर केलेल्या विविध कर्जमाफी योजनांचाही लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांकडील कर्जावरील व्याजाचा डोंगर वाढतच गेला. नोव्हेंबर २०२२ पर्यंत राज्यातील ३४ हजार कर्जदार शेतकऱ्यांकडे मुद्दल आणि व्याजाचे एकूण ९६४ कोटी १५ लाख रुपयांची थकबाकी होती. निसर्गाच्या लहरीपणाचा शेतीला फटका बसल्यामुळे शेतकरी कर्जाची परतफेड करू शकले नव्हते. शिवाय शासनाकडून कर्जमाफी दिली नव्हती.

हे पण वाचा :आरबीआय बँकेने महाराष्ट्रातील या चार बँकांवर केली मोठी कारवाई

 

 

Leave a Comment