Loan Recovery New Rule 2023

 

 

∆कुठल्याही बँकेने चूक केल्यास लगेच तक्रार नोंदवा :

 

आरबीआय बँकेने इतर बँकांना कर्ज वसुली बाबतचे काही नियम व अटी लागू केलेल्या आहेत. आणि काही अधिकार बँकेला देण्यात आलेले आहेत. कर्जाची वसुली बँक करत असताना नियमांचे उल्लंघन करू शकत नाही.

 

तुमच्याकडे बँकेचे काही हप्ते बाकी असल्यास बँक तुम्हाला काही ठराविक वेळामध्येच जसे की सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत या वेळेमध्ये तुम्हाला फोन अथवा तुमच्या घरी चौकशी साठी भेट देऊ शकते. पण यावरील नियमाचे बँकेचे कर्मचारी यांनी पालन नाही केल्यास आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता.

 

∆कोणत्याही बँकेला कर्जदारांशी गैर वर्तणूक करण्याचा अधिकार नाही.

 

कारण की आपण जेव्हा बँक कडून कर्ज घेतो त्यावेळी आपण आपल्या मालमत्तेचे कागदपत्रे बँकेत जमा केले असतात. त्यामुळे तुम्ही जर बँकेचे तीन हप्ते थकवले गेले असतील.तर बँकेकडून तुम्हाला नोटीस पाठवली जाईल. आणि बँकेद्वारे तुम्हाला दोन महिन्याचा वेळ दिला जाईल. तरीदेखील तुम्ही बँकेचे कर्ज नाही भरल्यास बँक तुमची मालमत्ता जप्त करू शकेल. पण इतर मासिक ताण तुम्हाला दिल्यास तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये बँक विरोधात तक्रार दाखल करू शकता.

 

 

 

 

Leave a Comment