आरोग्य विभाग मार्फत शिपाई कामगार पदांच्या 4010 पदासाठी मेगा भरती !

 

शासन पत्र क्र. पदभ- २०२३/प्र.क्र.५०९/सेवा-५, दिनांक ३१/७/२०२३ नुसार आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट क व ड पदभरतीकरिता यापूर्वी दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या रद्द झालेल्या परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता

 

टी.सी.एस.आय.ओ.एन. या कंपनीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी आवश्यक परीक्षा शुल्क भरून नव्याने अर्ज करणे आवश्यक राहील. दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या रद्द झालेल्या परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विभागाकडून सुविधा/ पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्या पोर्टलमध्ये उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क भरल्याचा बँक तपशील भरून देण्यात यावा.

 

विभागाकडून उमेदवारांनी भरलेली माहिती व मे, न्यासा कम्युनिकेशन प्रा.लि. यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करून संबंधित पात्र उमेदवारांना शुल्क परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल. दिनांक २४ व ३१ ऑक्टोबर २०२१ चे परीक्षार्थी शिथिलक्षम व्याधिक्याची मर्यादा पार करत असल्यास ते या परीक्षेचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत अर्ज भरण्यासाठी पात्र राहतील व उर्वरित सर्व उमेदवारांसाठी दिनांक ०३ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयानुसार

 

वयोमर्यादितील शिथिलता अनुज्ञेय राहील. शासन पत्र क्र. पदम-२०२२/प्र.क्र.१०३६/सेवा-५ दि. २२-८-२०२३ नुसार सदर पदभरती एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्याचे आयोजित आहे. यास्तव एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच जिल्ह्यात व इतर संवर्गासाठी तो अहंताधारक असल्यास शक्यतो त्याच जिल्ह्यात अर्ज भरण्यात यावा.

 

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

Leave a Comment