Old Pension Scheme News | केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी,या राज्य सरकारचे मॉडेल लागू करणार ?

 

■आंध्र प्रदेशचे मॉडेल उपयोगी पडू शकते –

एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, आंध्र प्रदेश सरकारने पेन्शनसाठी नवीन मॉडेल आणले आहे. याचाही विचार करता येईल. तेथे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कोणतीही कपात न करता त्यांच्या शेवटच्या मूळ पगाराच्या ३३ टक्के एवढी हमी पेन्शन देण्याचा प्रस्ताव आहे. ते पहिल्यांदा एप्रिल २०२२ मध्ये सादर करण्यात आले होते.

 

■ हमीभावाने किमान परतावा देण्याबाबत विचार –

ET च्या एका बातमीत अधिकार्‍यांचा हवाला देत, NPS च्या ग्राहकांसाठी अधिक आकर्षक बनवण्याचा सरकारचा मानस असल्याचे म्हटले आहे. गुंतवणूकदारांना किमान परतावा मिळण्याची खात्री देण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, या किमान परताव्यात काही कमतरता असल्यास सरकारने त्याची भरपाई करावी.

 

■ NPS बद्दल निर्मला यांनी हे सांगितले –

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती नवीन पेन्शन प्रणाली सुधारण्यावर लक्ष केंद्रित करेल. आथिर्क मर्यादेचे पालन करताना कर्मचाऱ्यांच्या समस्या दूर करण्यावर समिती भर देईल.संसदेत वित्त विधेयक 2023 सादर करताना ते म्हणाले की नवीन पेन्शन प्रणालीमध्ये अशा प्रकारे बदल केले जातील की केंद्र सरकार आणि राज्य सरकारे त्याचे पालन करू शकतील.

 

हे पण वाचा :एअर इंडिया एअर सर्विसेस मुंबई येथे 998 पदांची भरती 

 

 

 

 

Leave a Comment