LPG Gas Cylinder | आनंदाची बातमी सिलेंडरवर मिळणार ३०० रुपयांची सबसिडी…

 

 

LPG Gas Cylinder : दिवाळीपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने साम न्यांना मोठा दिलासा दिला आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान (सबसिडी) २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज झालेल्या बैठकीत घेतला.
रक्षाबंधन आणि ओणमच्या निमि त्ताने एलपीजीच्या दरात २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती. आज ही रक्कम २०० रुपयांवरुन ३०० रुपये करण्यात आली आहे.

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही डझॠ सिलिंडर २०० रुपयांनी कमी केले होते. ही किंमत ११०० रुपयांवरून ९०० रुपयांपर्यंत कमी केली.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ७०० रुपयांना गॅस मिळू लागला.पण, आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना फक्त ६०० रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहेGas Cylinder Price.

 

अनुराग ठाकूर यांनी इतर निर्णयांचीही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, भारत हा हळदीचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे. ८४०० कोटी रुपयांच्या हळदीच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी केंद्रीय हळद मंडळाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे. तसेच, उत्तर कोळसा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २४०० कोटी रुपये खर्च केले जातील.

 

हे पण वाचा : देशी जुगाड वापरून पत्रे पोहोचवले छतावर व्हिडिओ झाला तुफान व्हायरल.

 

 

Leave a Comment