Property Knowledge | वडिलांच्या संपत्ती मध्ये मुलींना हिस्सा कधी मिळत नाही,काय आहे कायदा ? येथे सविस्तर माहिती जाणून घ्या !

 

 

●कायद्यांच्या नियमाप्रमाणे :

 

विवाहित किंवा अविवाहित मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये एकसारखा वाटा देण्याचा कायदेशीर अधिकार हिंदू वारसा कायदा 1956 मध्ये साल 2005 मध्ये सुधारणा केली गेली असून संपत्तीवरील दावे व हक्कांच्या तरतुदी करता एकूण 56 मध्ये हा कायदा निर्माण करण्यात आला होता याप्रमाणे वडिलांच्या संपत्तीवर मुलांच्या इतकाच मुलीचा देखील अधिकार असणार आहे चाल 2005 मध्ये वारसा कायद्यामध्ये बदल केल्या गेल्यामुळे मुलींच्या हक्कांना बळकटी दिली गेल्याने वडिलांच्या संपत्तीवरील मुलींच्या हक्काविषयी शंका दूर झाल्या आहेत.

 

मुलींना वडिलांच्या संपत्तीवर हक्क केव्हा दाखवू शकणार नाही ते सविस्तर खाली पहा !

 

संपत्तीच्या बाबतीत मुलींची बाजू नेहमी कमकुवत असते वडिलांनी खरेदी केलेली संपत्ती जसे की शेती विकत घेणे घर बांधणे तर अशी संपत्ती वडील स्वतःच्या मर्जीने कोणालाही देऊ शकतात तसा त्यांना तो कायदेशीर अधिकार असतो जर मुलीच्या वडिलांनी मुलीला संपत्ती मध्ये वाटा नाही देण्याचे ठरवले तर मुलगी काहीच करू शकणार नाही.

 

 

जर मुलगी विवाहित असेल तर कायदा काय सांगतो ते खाली सविस्तर पहा !

 

साल 2005 च्या अगोदर मुलींना केवळ फक्त अविभक्त कुटुंबाचे सदस्य मानले जात होते. समान वारसदार मानले जात नव्हते. वारसदार अथवा समान वारसदार म्हणजेच चार पिढ्यांच्या अविरत संपत्तीवर ज्याचा हक्क असतो पण मुलींचा विवाह झाल्यानंतर तिला हिंदू अविभक्त कुटुंबाचा भाग मानण्यात येत नाही परंतु साल 2005 च्या दुरुस्तीनुसार समान वारसदार म्हणून मान्यत आले आहे. त्यामुळे आता मुलीचे लग्न झाल्यानंतरही वडिलांच्या संपत्ती वरील हक्क बदलल्या जात नाही यानुसार लग्नानंतरही वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क कायम असतो.

 

 

हे पण वाचा : सोलार पंप ला अर्ज केला असेल तर हे  काम त्वरित करा ?

 

 

 

 

Leave a Comment